कापूस दरात मोठी घसरण की तेजी? आयात वाढल्याने बाजारातील चित्र बदलणार; शेतकऱ्यांची चिंता वाढली
कापूस दरात मोठी घसरण की तेजी? आयात वाढल्याने बाजारातील चित्र बदलणार; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Read More
पीएम किसान योजना: यह काम करें तभी मिलेगी अगली किस्त, वरना हमेशा के लिए होगी
पीएम किसान योजना: यह काम करें तभी मिलेगी अगली किस्त, वरना हमेशा के लिए होगी
Read More
पैन कार्ड को आधार से लिंक करने की आसान और पूरी प्रक्रिया
पैन कार्ड को आधार से लिंक करने की आसान और पूरी प्रक्रिया
Read More
मानसून 2026 का पूर्वानुमान: अल नीनो का संभावित खतरा
मानसून 2026 का पूर्वानुमान: अल नीनो का संभावित खतरा
Read More
मौसम ने बदली चाल – ठंड/बारीश और कोहरे का अलर्ट
मौसम ने बदली चाल – ठंड/बारीश और कोहरे का अलर्ट
Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर… पहा हप्त्याची तारीख

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर… पहा हप्त्याची तारीख ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी अखेर राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणाबाबत अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले होते, मात्र आता यावर पडदा टाकणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यास ८ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील शासकीय निर्णय (GR) देखील निर्गमित करण्यात आला आहे.

सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या तिन्ही प्रवर्गांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २६३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच हप्ता वितरणाची नेमकी तारीख जाहीर केली जाईल. मंजूर झालेला हा निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या सर्व पात्र महिलांनी पुढील अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवून राहावे.

Leave a Comment